अॅग्रोवन स्मार्ट शेतकरी पुरस्कार २०१९ विजेते मान्यवर

पुणे : ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाची किमया शर्मा यांनी साधली आहे. पुण्याच्या बालगंधर्व नाट्यमंदिरात कौतुकाच्या शब्दसुमनांचा वर्षाव आणि टाळ्यांच्या गजरात त्यांना प्रख्यात ग्रामीण साहित्यिक डॉ. राजन गवस व ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.